Wednesday, November 11, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे विभाग शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी पिंपरीत भाजप-महायुतीची संघटनात्मक बैठक

पुणे विभाग शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी पिंपरीत भाजप-महायुतीची संघटनात्मक बैठक

डॉ. स्मिताताई जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

आमदार प्रसाद लाड, आमदार स्नेहाताई दुबे, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमाताई खापरे यांची प्रमुख उपस्थिती

पिंपरी, २१ ऑक्टोबर २०२६ : आगामी पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक चिंचवड येथील हॉटेल बर्ड व्हॅली येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. सौ. स्मिताताई जाधव (पदवीधर मतदारसंघ) आणि श्री. कौस्तुभ गावडे (शिक्षक मतदारसंघ) यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीचे पिंपरी विधानसभा प्रभारी तथा आमदार प्रसाद लाड, सहप्रभारी तथा आमदार स्नेहाताई दुबे, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, भाजप महाराष्ट्र प्रदेश ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठचे प्रभारी अनुप मोरे, पिंपरी-चिंचवड शिक्षक मतदारसंघ निवडणूक संयोजक राजेशअण्णा पिल्ले आणि सदाशिव खाडे तसेच उपमहापौर शर्मिला बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय, माजी नगरसेवक, भाजपचे सरचिटणीस, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलाध्यक्ष, निवडणुकीसाठी नियुक्त प्रमुख कार्यकर्ते, भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदार संपर्क आणि संघटन बळकटीकरणावर भर

बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदार नोंदणी, मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क अभियान आणि बूथ स्तरावरील संघटन अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लागावे, असे आवाहन प्रमुख नेत्यांनी केले.

प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आमदार अमित गोरखे यांचे आवाहन

यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित केले. महायुती सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय आणि धोरणे मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी नमूद केले.

बूथ स्तरावर मजबूत यंत्रणा उभारून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीच्या माध्यमातून आगामी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक तयारी, मतदार संपर्क आणि प्रचाराच्या नियोजनावर भर देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments