Monday, May 12, 2025
Homeगुन्हेगारी"कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावई आहे का सभापती महोदय?" विधानपरिषदेत...

“कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावई आहे का सभापती महोदय?” विधानपरिषदेत भाजप नेत्याचा संतत्प सवाल

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन अधिवेशनात विरोधकांकडून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरुन विधानसभेत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार गदारोळ सुरु असून बुधवारी विधानपरिषदेतही मुद्दा उपस्थित करण्यात आला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सभापती निलम गोऱ्हेंसमोर संतत्प झालेले दिसून आले.

“सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केल आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

“मनसुख हिरेन प्रकरणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत आहे. राज्यातील जनतेचा सरकावर विश्वास राहिलेला नाही. कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावई आहे का सभापती महोदय? का हे सरकार पाठीशी घालत आहे?,” असे संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारले. तसेच सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

यावेळी प्रवीण दरेकर यांनी कायदा-सुव्यस्थेवरुन सरकारवर निशाणा साधला. “पूजा चव्हाण प्रकरणात २० दिवस एफआयआर दाखल झाला नाही. लॅपटॉपवरील पुरावे गायब झाले, अरुण राठोड गायब आहे, रुग्णलयात गर्भपात करणारी पूजा अरुण राठोड कोण हे अजून समोर आलेलं नाही”.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments