Friday, June 13, 2025
Homeगुन्हेगारीपिंपळे गुरव भागात स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपळे गुरव भागात स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव भागात स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली दुचाकीस्वार शैलेश गजानन जगताप (वय- २९) असं अपघातात मृत्युमुखी पडले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपळे गुरव परिसरातील रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरातून शैलेश जगताप हे काटे पुरम चौकाकडे जात होते. दुचाकीवरून जात असताना शैलेश हे मोबाईलवर बोलत होते. परिणामी रस्त्यावर असणाऱ्या गतिरोधकाचा अंदाज त्यांना आला नाही आणि ते थेट जवळून जाणाऱ्या स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली पडले. बसच्या चाकाखाली चिरडले गेल्याने शैलेश जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.

शैलेश यांनी गाडीवर असताना हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. शैलेश जगताप यांच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.दरम्यान, दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. तसंच मोबाईल बोलणं टाळावं, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments