Friday, September 29, 2023
Homeक्रिडाविश्वकोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब लढतीत पाहायला मिळणार सर्वात मोठा...

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब लढतीत पाहायला मिळणार सर्वात मोठा क्लायमॅक्स

२६ ऑक्टोबर २०२०,
आयपीएलच्या १३ व्या हंगामात आज सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात लढत आहे. पंजाबने सलग चार विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले आहे. या दोन्ही संघातील लढतीत आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा क्लायमेक्स पाहायला मिळू शकतो.

दोन्ही संघातील आजवरच्या लढतीत कोलकाता १८ विरुद्ध ८ ने पुढे आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामात प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी कमालीची चुरस सुरू आहे. गुणतक्त्यात कोलकाता १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर पंजाबने ११ पैकी ५ विजय मिळून १० गुण मिळवले आहेत. आज कोलकाताने विजय मिळवल्यास त्यांचे १४ गुण होतील. तर पंजाबने विजय मिळवल्यास ते १२ गुणांसह अव्वल चार संघात पोहोचतील आणि त्यांची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता देखील वाढेल.

पंजाबचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सलग पाच पराभवानंतर त्यांनी बेंगळुरूचा पराभव केला. त्यानंतर अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई आणि दिल्लीचा पराभव केला तर हैदराबादचा पराभव करून त्यांनी विजयाचा चौकार मारला. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना शिल्लक ३ सामन्यात विजय मिळवावा लागले.

गोलंदाजी ही पंजाबची डोकेदुखी ठरली आहे. मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई वगळता अन्य कोणत्याही गोलंदाजाला प्रभाव पाडता आला नाही. शनिवारी हैदराबादविरुद्ध फलंदाज अपयशी ठरल्यावर गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. अखेरच्या दोन षटकात ५ विकेट घेत १२६ धावांचा बचाव केला. स्वत: कर्णधार केएल राहुल, मयांक अग्रवाल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. ख्रिस गेल संघासाठी लकी ठरला आहे. तो आल्यापासून पंजाबने एकाही सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. निकोलस पूरन देखील स्फोटक फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिले आहे. ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म हाच काय तो पंजाबसाठी काळजीचा विषय आहे.

कोलकाताने गेल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. नितिश राणा आणि सुनिल नरेन यांनी ११५ धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने पाच विकेट घेत दिल्लीचा ५९ धावांनी पराभव केला होता. कोलकाताला जर विजय मिळवायचा असेल तर त्यांना फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments