Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी मोठी बातमी, गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहील…

पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी मोठी बातमी, गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहील…

पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा येत्या गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहील. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरवासियांना आवश्यक तितके पाणी भरुन ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी सायंकाळाचा पाणी पुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचेही पिंपरी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळवले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.10) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments