Monday, December 4, 2023
Homeगुन्हेगारीमोठी बातमी- ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईत अटक…

मोठी बातमी- ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईत अटक…

ससून रुग्णालयातून पळून गेलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. त्याला महाराष्ट्रात आणले जात असून न्यायालयात हजर केले जाणार आहे. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. पुणे पोलिसांची दहा पथके तसेच मुंबई व नाशिक पोलिस त्याचा शोध घेत होती.

ससुन रुग्णालयात असतांना ड्रग्ज माफिया ललित पाटील हा तेथून ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवत होता. ससुन रुग्णालयापुढे मोठे ड्रग्ज सापडल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. यानंतर ललित पाटील हा ससुन रुग्णालयातून फरार झाला होता. गेल्या १५ दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिक पोलीस ललित पाटील याच्या मागावर होते. मात्र, ललित पाटील हा पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, ललित पाटील याच्या नाशिकच्या कारखान्यावर छापा टाकून कोट्यावधींचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलीस ललित पाटील याचा शोध घेत होते.

पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा शोध घेण्यासाठी पथकांची स्थापना केली होती. महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील पोलीस ललित पाटीलचा शोध घेत होते. दरम्यान, ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांचे एक पथक चेन्नई येथे ललित पाटील याच्या मागावर होते. त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईत आणले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments