Sunday, December 3, 2023
Homeबातम्यामोठी बातमी …!! समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात… !!

मोठी बातमी …!! समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात… !!

नांदेडहून मुंबईकडे ही कार निघाली होती. समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यतील धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला

 समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात घडला होता. या अपघातामध्ये 25 लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कार डिव्हायडरला धडकून झालेल्या या अपघातामध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही गाडी नांदेडहून मुंबईकडे निघाली होती.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडहून मुंबईकडे ही कार निघाली होती. समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यतील धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. भरधाव गाडी रोडवरील दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये एका महिलेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाहीयेत. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमीक माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments