Thursday, December 12, 2024
Homeगुन्हेगारीसदाशिव पेठ हल्ला प्रकरणी मोठी माहिती पुढे .. हल्ला करण्याचे खरे कारण...

सदाशिव पेठ हल्ला प्रकरणी मोठी माहिती पुढे .. हल्ला करण्याचे खरे कारण …

हल्ल्यानंतर दोन तरुणांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर आरोपीला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, मुळशी) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ मंगळवारी (दि. २७) सकाळी दहाच्या सुमारास तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. या तरुणीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिस जबाबात म्हटले आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शंतनूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी दोन तरुणांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर त्यास बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक पूनम पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहोत.

आरोपीच्या रक्ताचे रासायनिक विश्लेषण

आरोपी शंतनू जाधव याच्या रक्ताच्या नमुन्याचे रासायनिक विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यासाठी रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला आहे. त्याचा पुढील तपासासाठी वापर होणार आहे. आरोपीने कोयता कोठून आणला, याबाबत त्याकडे तपास करायचा आहे. याचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. वर्षाराणी जाधव यांनी केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments