Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीभोसरीत केमिकल कंपनीला मोठी आग ; १३ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल

भोसरीत केमिकल कंपनीला मोठी आग ; १३ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल

७ नोव्हेंबर २०२०,

भोसरी एमआयडीसीतील गवळीमाथा येथील वाहन कार्यशाळे समोर एका केमिकल कंपनीत मोठी आग आज दुपारी साडेबाराच्या सुमारास लागली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एमआयडीसी मिळून 13 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

त्यांच्या सहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दल व पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. या आगीत आत्ता पर्यंत कोणीही जखमी नसल्याचे घटनास्थळी असलेल्या जवानांकडून सांगण्यात आले. मात्र, कंपनीत मोठा केमिकल साठा असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. त्यामुळे अग्निशामक विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments