Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीMPSC विद्यार्थ्यांच्या मोठा गोंधळ ! विद्यार्थी- पोलिसांची बाचाबाची

MPSC विद्यार्थ्यांच्या मोठा गोंधळ ! विद्यार्थी- पोलिसांची बाचाबाची

पुण्यामध्ये एमपीएसीसीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. 25 तारखेला होणाऱ्या एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील नवीपेठेतील शास्त्री रोडवर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

एमपीएसीसीचे विद्यार्थ्यी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत. मागच्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. आमदार रोहित पवारदेखील या विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करत आहेत. अशात प्रशासन याबाबत सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे शांततेचं आवाहन पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना करण्यात आलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये हुज्जत झाल्याचं समोर आलं आहे.

राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा एकाच दिवशी पेपर आल्याने यातील एका पेपरची तारीख बदलण्यात यावी. तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट कराव्यात, या मागण्यांसाठी एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

पुण्यातील नवीपेठमधल्या शास्त्री रोडवर एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये. सरकारने लवकरात लवकरच याबाबत निर्णय घ्यावा, असं रोहित पवार म्हणाले.

विद्यार्थांच्या आंदोलनाची दखल एमपीएससी आयोगाने घेतली आहे. आज सकाळी एमपीएससी आयोगाने या संदर्भात बैठक बोलावली होती. ही बैठक सध्या सुरु आहे. मात्र या बैठकीतील तपशील अद्यापपर्यंत समोर आलेले नाहीत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments