Friday, June 13, 2025
Homeआरोग्यविषयकबिग ब्रेकिंग : राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे...

बिग ब्रेकिंग : राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद , मिनी लाॅकडाऊन लागू

राज्यात ओमायक्रॉनचा कहर सुरू झाल्याने पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंधघालण्यात आले असून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद राहतील.

शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. जारी करण्यात आलेली नियमावलीमध्ये शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंगमॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी आहे. मुंबई लोकलबाबत कोणताहीनिर्णय घेण्यात आलेला नाही.

  • उद्या मध्यरात्रीपासून राज्‍यात नवे नियम लागू.
  • रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू
  • मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार
  • रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्‍के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू
  • २ डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ
  • राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
  • खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी
  • खासगी कार्यालये ५० टक्‍के क्षमतेने सुरू राहतील
  • लग्‍नासाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी
  • हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
  • स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा
  • २४ तास सुरु राहणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत
  • दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई
  • राज्यात प्रवेश करताना लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
  • दुकाने हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांसाठी दोन्ही डोस बंधनकारक.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments