Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमी‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन

‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन

‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 3 महिन्यांपूर्वी त्यांना कोरोना देखील झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. बिग बॉसच्या ‘सीझन 10’ मध्ये स्वामी ओम स्पर्धक म्हणून दिसले होते. कोरोना झाल्यावर त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे सांगितले जात आहे, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. याच अवस्थेत, काही काळापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी आपल्या निवासस्थानी डीएलएफ अंकुर विहार येथे अखेरचा श्वास घेतला.

कोरोनामधून बरे झाल्यानंतर स्वामी ओम यांना चालण्यास खूप त्रास होत, असल्याचे सांगितले जात होते यानंतर त्यांच्या अर्ध्या शरीरावर अर्धांगवायू झाला ज्यामुळे गेल्या 15 दिवसांत त्याची प्रकृती अधिकच खराब झाली आणि आज (3 फेब्रुवारी) त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अंतिम संस्कार आज दुपारी दीड वाजता दिल्लीतील निगम बोध घाटावर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

‘बिग बॉस 10’ ने त्याला ‘कॉन्ट्रोव्हिएशनल गुरू’ असे नाव दिले होते. त्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या आरोपाखाली अटक केली होती. ‘बिग बॉस 10’ संपल्यानंतर दिल्लीच्या इंटर स्टेट क्राइम ब्रँचने भजनपुरा भागातून त्यांना अटक केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. स्वामी ओम यांच्यावर चोरी करणे, हत्यारे बाळगणे आणि इतरांच्या घरात घुसणे, असे अनेक आरोप होते. त्यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments