Tuesday, April 22, 2025
Homeगुन्हेगारीपुण्यातील FC रोडवरील ड्रग्सप्रकरणात मोठी कारवाई, 5 जण ताब्यात ; बार सील

पुण्यातील FC रोडवरील ड्रग्सप्रकरणात मोठी कारवाई, 5 जण ताब्यात ; बार सील

पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् एकच खळबळ माजली. पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यात विरोधकांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर प्रशासनाकडून धडक कारवाई सुरु करण्यात आली. पोलीस दलातील दोन बिट मार्शल यांचं निलंबन करण्यात आलेय. कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय संबंधित हॉटेलही सील करण्यात आले आहे.

पुण्यातील लिक्वीड लिजर लाउंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. हॉटेलमधील पाच जणांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. हॉटेलमधील ज्या ठिकाणी परवानगी नव्हती, तिथे सुद्धा मद्य साठा ठेवला होता, त्याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. हॉटेलमधील एका मजल्यावर मद्याचा साठा ठेवण्यात आला होत्या. त्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.

बार सील करण्यात आला, अनेकांना ताब्यात घेतलं –

पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी याप्रकऱणाची प्रसार माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, शनिवारी रात्री पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या एल ३ नावाचं एक बार आहे. त्यांना दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळेपर्यंत तो सुरू ठेवण्यात आला होता. 2 मालकांनी हा बार पुढे 3 जणांना चालवायला दिला होता.

एका इव्हेंट मॅनेजरने 40 ते 50 लोकांना तिथे पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांना विचारली होती. रात्री १.३० नंतर बार चे मुख्य प्रवेश द्वार बंद केले आणि दुसऱ्या गेट ने तिथे आत जाण्याची परवानगी दिली. यातील सर्व जणांना ताब्यात घेतले आहे. एल ३ बार सील करण्यात आला आहे.

जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तो पदार्थ कोणता आहे. हे अमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहेत. १८८ कलम, महाराष्ट्र दारूबंदी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments