G20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज भारतात दाखल होणार आहेत.
G20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज भारतात दाखल होणार आहेत. ते अमेरिकेतून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. बायडन यांची कोरोन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं त्यांच्या येण्याबाबत स्पष्टता नव्हती.मात्र, त्यानंतरचे बायडन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बायडन G 20 साठी भारतात दाखल होत आहेत. या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे.

बायडन यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था
बायडन यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तो दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये राहणार आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन हे त्यांच्या खास विमान एअर फोर्स वनने येथे पोहोचत आहेत. त्याच्यासोबत अमेरिकन गुप्तचर विभागाचे सुरक्षा कर्मचारी आणि वाहनांचा संपूर्ण ताफाही भारतात पोहोचत आहे.
महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार
अमेरिकेचे अध्यक्ष बायडन हेदेखील G-20 शिखर परिषदेसाठी उत्सुक होते. कारण या परिषदेत ते महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये हवामान बदल आणि जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या मुद्यांवर चर्चा होमार आहे. तसेच या G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची अपेक्षा होती. दोन्ही नेते GE फायटर जेट इंजिन करारावर चर्चा करणार होते. या कराराला अमेरिकेच्या संसदेने नुकतीच मंजुरी दिली होती. त्याशिवाय, लहान आकाराच्या अणुभट्ट्या, व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबतही चर्चा होणार होती.
जी-20 परिषदेसाठी ‘या’ देशांचे प्रमुख हजर राहणार?
जी-20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नवी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारत दौऱ्यावरून माघार घेतल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील भारत दौऱ्यात उपस्थित राहणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, G20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज भारतात दाखल होणार आहेत. ते अमेरिकेतून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत.