पिंपरी, ता.5: चिखली परीसरातील नव्यानेच तयार झालेल्या गृह्प्रकल्पातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी प्रभागाचे नगरसेवक तथा मा. महपौर राहुल जाधव, दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पत संस्थेच्या चेअरमन सौ. मंगलताई राहुलदादा जाधव उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना राहुल जाधव म्हणाले की, आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वात या भागाचा विकास होत असताना नागरिकीकरण झपाट्याने वाढले आहे. तरी या भागातील गृह्प्रकल्पातील रहिवास्यांना अनेक मुलभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागत आहे तसेच अनेक बांधकाम व्यावसायीकांनी रहिवाश्यांना कराराप्रमाणे मुलभूत सुविधा देणे अपेक्षित होते परंतु संबधित बांधकाम व्यासायीकांनी या रहिवाश्यांना कराराप्रमाणे मुलभूत सुविधा दिलेल्या नाही. रहिवाश्यांच्या प्रश्नासाठी संबधित बांधकाम व्यावसायिकांशी बोलून प्रसंगी संघर्ष करून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील तसेच या भागातील नागरिकांचे रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील असे जाधव यांनी सांगितले. तसेच या कोरोना काळामध्ये या भागातील लोकांसाठी रुग्णवाहिकेची गरज ओळखून मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवन्यासाठी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करत असल्याचे मत मांडले.

यावेळी बोलताना आदरणीय आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता अनेक मुलभूत सुविधांवर मोठ्याप्रमाणात ताण येत आहे. पाण्याची समस्या खूप मोठी आहे. पुढील काही काळा मध्ये भामाआसखेडचे पाणी या भागातील नागरिकांना भेटेल तसेच वाघोली पाणी पुरवठा योजना ताब्यात घेऊन परीसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे लांडगे यांनी सांगितले. कोरोना काळामध्ये राहुलदादा आणि मंगलताई जाधव यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे आमदार लांडगे यांनी कौतुक केले. तसेच यापुढील काळामध्ये सर्वांनी आपापली काळजी घेऊऩ मास्काचा वापर करण्याचे आव्हान महेश लांडगे यांनी केले.
यावेळी ऐश्वर्यंम हमारा रिवर रेसीडेन्सी वास्तू, ड्रिम मिलिनियम पँरामाउट, ऐश्वर्यंम हमारा, म्हाडा क्रिस्टल सीटी, रामकृष्ण हरी, स्वस्तिक स्पिरा, कोलुसुस ग्रीन सीटी, अक्षा वृंदावन, अक्षा अँम्पयर, भूमी सिलिरिओ वैष्णवी ,गायत्री लेन्स जी.के. कनवर, आकाश वेदअध्याराध विष्णू विहार, विष्णू ग्रीन एवरेस्ट, प्लाझा लवनेस्ट इत्यादी सोसायट्यांमधील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मास्क परिधान करून सामाजिक अंतर पाळुन या कार्यक्रमा मध्ये भाग घेतला.