Thursday, May 23, 2024
Homeउद्योगजगतभोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पटेल समाजाची मागितली माफी, नेमकं काय आहे...

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पटेल समाजाची मागितली माफी, नेमकं काय आहे प्रकरण ….

पिंपरी-चिंचवड महापालिका आवारातच उद्योजक (बिल्डर) नरेश पटेल यांना मारहाण झाली. त्यामुळे पटेल समाजाचे खच्चीकरण झाले, अशी भावना पटेल समाजाची आहे. आम्ही चुकीच्या गोष्टीचे कधीही समर्थन करणार नाही. आम्ही आपल्याबरोबर आहोत. मी सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे यांच्या कृत्याबद्दल पिंपरी-चिंचवडचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून समाजाची माफी मागतो. या पुढील काळात उद्योजक, व्यावसायिक आणि भूमिपूत्र यांच्यात वादाचा प्रसंग होणार नाही. हातात हात घालून आपण शहराचा विकास करू, असे आवाहन भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका आवारातच उद्योजक नरेश पटेल यांना मारहाण झाली. त्यामुळे पटेल समाजाचे खच्चीकरण झाले, अशी भावना पटेल समाजाने व्यक्त केली होती. त्यावर आमदार महेश लांडगे यांनी सामंजस्याची भूमिका घेत आम्ही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत. अशा भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

तसेच येणाऱ्या काळात उद्योजक, व्यावसायिक आणि भूमिपूत्र यांच्यात वादाचा प्रसंग होणार नाही. हातात हात घालून आपण शहराचा विकास करू, असे आश्वासन देखील महेश लांडगे यांनी दिले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे यांनी जमीन व्यवहारातील वादातून उद्योजक नरेश पटेल यांना महापालिका आवारातच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी हा सर्व प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला. नितीन बोऱ्हाडे हे आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे पटेल समाजाने थेट आमदार लांडगे यांना साकडे घातले होते.

बांधकाम व्यवसायिक नरेश पटेल यांच्यासारख्या वादाच्या घटना पुन्हा घडू नयेत. याकरिता शहरातील पटेल समाजाने आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर नवरात्रोत्सव सुरू आहे. त्या ठिकाणी महाआरतीनंतर पटेल समाजाच्या समुहाने लांडगे यांच्यासोबत या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. सुमारे दीड हजार समाज बांधवांसमोर आमदार लांडगे यांनी पटेल समाजाची माफी मागितली.

‘‘आम्ही गेल्या ३० ते ४० वर्षांपासून या शहरात व्यवसाय करीत आहोत. २० वर्षे आम्ही आपल्याला पाहतो. या पूर्वी असा कधीही प्रकार घडला नाही. शहरात आम्ही तुमच्या भरवश्याने व्यवसाय करीत आहोत. त्यामुळे या प्रकरणात तोडगा काढावा…’’ असे साकडे पटेल समाजाकडून घालण्यात आले. दिलीप पटेल म्हणाले ‘‘यह पटेल समाज आप के साथ रहा है। हम सब मिलजुल कर काम कर रहें है। पटेल परिवार शांती से रहेता है। महेशदादा आपको इस विवाद में समझोता करना होगा. यावर आमदार महेश लांडगे यांनी माफी मागताच ‘‘दादा आप क्यों माफी मांग रहे हो। हम आप के भरोसे है। आप को माफी मांगने की जरुरत नहीं” अशा शब्दांत पटेल बांधवांनी भावना व्यक्त केल्या.

नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेल यांची आगामी दोन-तीन दिवसांत एकत्रित बैठक घेवून आणि सामोपचाराने वाद मिटवण्यात येईल. यापुढील काळात असा प्रकार होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. यांचा सामोपचाराने वाद मिटवणार आहोत.,असे महेश लांडगे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments