Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीभोसरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजयी उमेदवार महेश लांडगे यांना निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ...

भोसरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजयी उमेदवार महेश लांडगे यांना निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र सुपूर्द 

भोसरी विधानसभा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत  विजयी झालेले उमेदवार श्री. महेश (दादा) लांडगे यांना निवडणूक निरीक्षक श्री. वीणा हूडा यांच्या उपस्थितीत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.

भोसरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे मतमोजणी कक्षात सुरळीत पार पडली. या निवडणुकीमध्ये   श्री. महेश (दादा) लांडगे विजयी झाले. त्याबद्दल त्यांना बालेवाडी स्टेडियम येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे, रविद्र रांजणे, मतमोजणी आराखडा व स्ट्रॉंग रूम व्यवस्थापन समन्वय अधिकारी श्री राजेंद्र काकडे, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वय अधिकारी श्री वायकर, मनुष्यबळ व्यवस्थापन श्री. निलेश खोसे, टपाली मतदान समन्वय अधिकारी श्री. राजेश आगळे, एनकोर व्यवस्थापक श्रीमती सविता दातिर, कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉयमेट प्लॅन श्री विजय काळे, आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी अभय वीर , माध्यम कक्ष समन्वय अधिकारी श्री पोंगळे, निवडणूक सहाय्यक भावना पवार आदी उपस्थित होते.

सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, पोलिस अधिकारी व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहभागी अधिकारी / कर्मचारी यांचे मन:पूर्वक आभार मानले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments