कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने तब्बल 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
हे आहेत भाजपचे स्टार प्रचार…
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीष बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रविंद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, माजी मंत्री बाळा भेगडे, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा 40 जणांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
केंद्र, राज्य आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करुन घेण्यात आला आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे.