१० डिसेंबर २०२०,
निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेला उड्डाणपूल आज (गुरुवार दि. 10 डिसेंबर 2020) खुला करण्यात आला.
भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे उद्घाटन महापौर उषा ढोरे व भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप, आशा शेंडगे, सुमन पवळे, अमित गावडे, सचिन चिखले, सुरेश भोईर, उत्तम यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
मुंबईहून पुण्याकडे येताना पिंपरी-चिंचवडचे प्रवेशव्दार म्हणून निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकाची ओळख आहे. येथील वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रोटरी उड्डाणपुल हाती घेण्यात आला आहे. उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर, रोटरी रस्ता बांधण्यात आला. मात्र, संथ गती कामामुळे चौकातील वाहतुकीस अडथळा होत होता. पुणे, मुंबईकडे जाणा-या वाहनचालकांना, तसेच स्थानिक नागरिकांना लांबचा वळसा घालून जावे लागत आहे. वाहतुकीच्या सोयीसाठी हा पूल सूरू करण्याची मागणी शर्मिला बाबर यांनी लावून धरली होती.
त्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठपुरावा करून, त्यांच्यासह उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यानंतर अखेर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीच्या सोयीसाठी हा उड्डाणपूल महत्वाचा आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे वाहनचालकांना वळसा वाचणार असून त्यांना होणारा त्रास कमी होणार आहे, असे अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांनी म्हटले आहे.