Sunday, June 15, 2025
Homeअर्थविश्वशहरातील वाहन पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीला प्रारंभ, असे असतील पार्किंगचे दर

शहरातील वाहन पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीला प्रारंभ, असे असतील पार्किंगचे दर

२ जूलै २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरातील वाहन पार्किंग धोरणाच्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीला आजपासून प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ८० जागांचा समावेश आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते या अंमलबजावणीचा शुभारंभ करण्यात आला. पिंपरी येथील सिट्रस हॉटेल समोरील जागेत सशुल्क वाहनतळ करण्यात आले आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचे औपचारीक आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापु गायकवाड आदी उपस्थित होते. वाहनतळाच्या ठिकाणी महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी शुल्क भरुन आपले वाहन पार्क करुन वाहन पार्कींग धोरणाचा शुभारंभ केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली आहे. यात १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकुण ४५० पे अँड पार्कची ठिकाणे आहेत. यातील सुमारे ८० जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिक व वाहन चालकांच्या माहितीस्तव शहरातील पार्किंग ठिकाणांची यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. नो पार्किंग ठिकाणांची यादी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय (वाहतुक विभाग) प्रसिध्द करणार आहे.

क्र.रस्त्यांची नावेपॅकेज क्र.जागा
भक्ती शक्ती उड्डाण पुलाखाली आणि जवळचा परिसरपॅकेज क्र. – ६
निगडी उड्डाण पुल (कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाखाली आणि जवळचा परिसर)पॅकेज क्र. – ६
जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी खंडोबा माळच्या जवळचा परिसरपॅकेज क्र. – १
चिंचवड स्टेशन आय आर बी एल बॅक आणि मुंबई सिलेक्षणपॅकेज क्र. – १
एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खालीपॅकेज क्र. – ६
पिंपरी-फिनोलेक्स चौक चा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकपॅकेज क्र. – १
जुना मुंबई पुणे रस्ता नाशिक फाटा कासारवाडी खराळवाडी आणि दापोडीपॅकेज क्र. – १
चिंचवड स्टेशन ते के. एस. बी. चौकपॅकेज क्र. – ३
निगडी ते बीग इंडिया (सावली हॉटेल)पॅकेज क्र. – १
१०भक्ती शक्ती चौक ते वाल्हेकरवाडी भेळ चौकएचडीएफसी बॅकछत्रपती संभाजी महाराज चौकवाल्हेकरवाडीपॅकेज क्र. – १
११निगडी ते भोसरी थरमॅक्स चौकएचडीएफसी कॉलनीगवळी माथा विजय सेल्सपॅकेज क्र. – २
१२हिंजेवाडी ते चिंचवड स्टेशन डांगे चौकचाफेकर चौक स्मार्ट पार्किंगचाफेकर चौक ते लोकमान्य हॉस्पीटलपॅकेज क्र. – २१०
१३आकुर्डी रेल्वे स्टेशन चे समोरील आणि मागील गेट आणि रेल्वे स्टेशन जवळचे रस्तेपॅकेज क्र. – १
१४काळेवाडी फाटा ते एम्पायर इस्टेट (उड्डाणपूल चालू होईपर्यंत)पॅकेज क्र. – २
१५नाशिक फाटा ते वाकड (कोकणे चौक आणि शिवार चौक चा परिसर)पॅकेज क्र. – ४

महापालिका सभेने मान्यता दिलेले  वाहन पार्किंगचे दर खालीलप्रमाणे

वाहनाचा प्रकारZone A, Zone B, Zone C, साठीचे दर प्रती तास रक्कम  रुपये
दुचाकी५/-
रिक्षा५/-
चारचाकी१०/-
टेम्पो/चारचाकी मिनी ट्रक१५/-
मिनी बस२५/-
खाजगी बस१००/-
ट्रक / ट्रेलर१००/-
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments