बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणानं अगोदर सतत फोन करून वीस वर्षीय विवाहितेचा संसार मोडला. त्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महेश अजिनाथ राख असं या तरुणांच नाव आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पीडितेवर अत्याचार
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा तरुण सतत फोन करून या विवाहितेला त्रास द्यायचा. या तरुणामुळे तिचा संसार मोडला. त्यानंतर तिच्या पतीनं तिला माहेरी आणून सोडलं. संबंधीत पीडित तरुणी तिच्या माहेरी राहत होती. तिच्या माहेरच्या घरी घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं या विवाहितेचं तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान या प्रकरणी पीडित तरुणीच्या वतीनं बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी महेश राख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.