Wednesday, June 18, 2025
Homeगुन्हेगारीराज ठाकरेंविरोधात बीड न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

राज ठाकरेंविरोधात बीड न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. येथील प्रथम वर्ग परळी वैजनाथ दिवाणी न्यायालयाने हे वॉरंट जारी केलं आहे. जामीन करून देखील सतत तारखेला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येत असल्याचं न्यायलायने म्हटलं आहे.

केस क्रमांक आर. सी. सी. १४०००३८/२००९ प्रकरणी बीडमधील परळी वैजनाथ न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीमध्ये वारंवार जामीन दिल्यानंतरही राज ठाकरे न्यायलयासमोर हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयामध्ये या प्रकरणी महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज ठाकरे असा युक्तीवाद सुरु आहे. आरोपी हा सतत गैरहजर असल्याने आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येत आहे. पुढील सुनावणीला त्यांना न्यायालयासमोर हजर करावे असं न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलंय. २००८ साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळी मध्ये परिवहन मंडळाच्या बसेस वर दगडफेक केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments