२०२२ ग्रुप बी मध्ये टीम इंडियासाठी बांगलादेशविरुद्धचा सामना फार महत्वाचा असेल. कारण यापूर्वी त्यांना एक पराभवाचा धक्का बसला आहे, त्यामुळे या सामन्यातही भारताचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामन्यात भारत सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. दोन्ही संघ हा सामना ऐतिहासिक ॲडलेड ओव्हलमध्ये खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
रोहित शर्माने टॉस झाल्यावर आपण आज एक बदल करणार असल्याचे जाहीर केले. या सामन्यासाठी भारतीय संघातून दीपक हुडाला संघाबाहेर करण्यात आले. हुडाच्या जागी यावेळी अक्षर पटेलला संधी देण्यात आली.
पिच रिपोर्ट…
ॲडलेड ओव्हल स्टेडियममधील खेळपट्टी नेहमीच फलंदाजांना साथ देत आहे. मात्र झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स यांच्यात झालेल्या सामन्यावरून आधी दोन्ही संघांचे कर्णधार आधी गोलंदाजीचा निर्णय घेतील. पावसाळी वातावरण देखील आहे. तसेच ड्रोपिन पिच असल्याने येथे खूप धावा होतात.