Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीबहुजन समाज पार्टीचे शिरूरचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांच्या प्रचारास प्रारंभ

बहुजन समाज पार्टीचे शिरूरचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांच्या प्रचारास प्रारंभ

शिवराय आणि बाबासाहेबांना अभिवादन करून हत्ती चिन्ह घरोघरी पोहचविण्याचा निर्धार

शिरूर लोकसभा मतदार संघाचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल ओव्हाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुरूवारी (दि.2) आपल्या प्रचाराची सुरूवात केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व नागरिक तसेच, आंबेडकरी व दलित चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी हत्ती चिन्ह घरोघरी पोचविण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला.

भोसरीतील अशोक नगर येथील त्रिरत्न बुध्द विहार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला राहुल ओव्हाळ यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच, राहुल ओव्हाळ यांनी भोसरी येथील पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रचाराला सुरूवात करण्यात आली. शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या घरोघरी हत्ती चिन्ह पोहचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. 

यावेळी शिरूर लोकसभेचे प्रभारी बाळासाहेब आवारे, पुणे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कुदळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुशील गवळी, भोसरी विधानसभा अध्यक्ष धम्मदीप लागाडे, सहा विधानसभाचे निरीक्षक अशोक गायकवाड, भोसरी आणि हडपसर विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments