Tuesday, December 10, 2024
Homeबातम्याभोसरी विधानसभेतील समस्त मागासवर्गीय समाज आमदार महेश दादा यांच्या पाठीशी- आमदार अमित...

भोसरी विधानसभेतील समस्त मागासवर्गीय समाज आमदार महेश दादा यांच्या पाठीशी- आमदार अमित गोरखे

भोसरी विधान सभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री महेश दादा लांडगे यांचे हात बळकट करण्यासाठी भोसरी विधानसभेतील मातंग तथा मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक भोसरी मतदार संघ मध्ये पार पडली यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील 400 पेक्षा जास्त मागासवर्गीय मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार अमित गोरखे यावेळी म्हणाले..आमदार महेश लांडगे यांनी केलेले दुसरी विधान सभेतील कार्य अतुलनीय आहे आज मी आमदार होत असताना त्यांनी मला केलेले हक्काने मतदान हे समाज कधीही विसरणार नाही ,आज भोसरी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे असे संविधान भवन त्यांनी उभे करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मोठी मानवंदना दिलेली आहे, ते स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष असताना निगडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बांधण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.. त्याचबरोबर दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला मनपाकडून मोठे अनुदान देण्याचे कामही ते करीत आहेत त्यांच्या मतदारसंघातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांनी आर टी ई च्या माध्यमातून मोफत प्रवेश दिलेले आहेत, भोसरी मतदारसंघात मागासवर्गीयांसाठी घरे असतील किंवा घरकुल शहर योजनेतील घरे असतील हे मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

महायुतीच्या माध्यमातून मातंग तथा मागासवर्गीय समाजाला नुकतेच घरकुल बांधणीचे अनुदान दीड लाख हुन अडीच लाखापर्यंत करण्यात आले ,त्यांच बरोबर 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन मधील घर असेल किंवा पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक असेल बार्टीच्या धरती वर आर.टी. ची निर्मिती असेल अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील स्मारक असेल अशा अनेक मागासवर्गीय जनतेसाठीच्या चांगल्या गोष्टी महायुती सरकारने केलेल्या आहेत. त्यामुळें संपूर्ण मागासवर्गीय समाज महायुतीचे उमेदवार श्री महेश लांडगे यांच्या सोबत

असेल, व त्यांच्या विजयात भोसरी तील मागासवर्गीय जनतेचा मोठा वाटा असेल.. असे अमित गोरखे याप्रसंगी म्हणाले. 

माननीय आमदार महेश दादा लांडगे यांनीही येणाऱ्या काळामध्ये भोसरीतील मागासवर्गीय जनतेसाठी अनेक योजना आणण्याचा प्रयत्न असेल असे ते म्हणाले त्याचबरोबर त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा समोर मांडला. 

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आढागळे, श्री संदिपान झोंबाडे, बापू घोलप,डॉ धनंजय भिसे, नितीन घोलप, मा नगरसेविका अनुराधा गोरखे, कीर्ती जाधव, व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन  किर्ती मारुती जाधव यांनी केले होते, सूत्रसंचालन अरुण जोगदंड यांनी केले आभार युवराज दाखले यांनी मांनले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments