Thursday, May 23, 2024
Homeताजी बातमी"बॅक टू स्कूल" चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध….. चित्रपट २२ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

“बॅक टू स्कूल” चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध….. चित्रपट २२ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

“बॅक टू स्कूल” मध्ये अनुभवी कलाकारांसह अनेक नवीन कलाकारांना संधी

शाळा… या वास्तुशी आपले सगळ्यांचेच एक भावनिक नाते जुळलेले असते. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या दिवसांपर्यंतच्या असंख्य आठवणी मनात कायमच कोरलेल्या असतात मग त्या चांगल्या असो वा कटू. प्रत्येकाची नाळ ही शाळेशी जोडलेली असतेच. शाळेच्या याच अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यासाठी सतिश महादु फुगे घेऊन आले आहेत ‘ बॅक टू स्कूल’. रंगसंस्कार प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे पोस्टर शनिवारी पिंपरीत चित्रपटातील ज्येष्ठ कलाकार व निवृत्त शिक्षिका वीणा वैद्य यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले.

हा चित्रपट २२ जून प्रेक्षकांच्या भेटीस पुणे, मुंबई सह महाराष्ट्रातील अनेक चित्रपट गृहात येत आहे अशी घोषणा निर्माते दिग्दर्शक सतीश महादू फुगे यांनी केली. अनुभवी कलाकार सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार यांच्यासह आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ. परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी, ईशा अग्रवाल, प्रसाद कुलकर्णी, विराज जाधव,आयुष जगताप, तुषार गायकवाड, यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड, आर्या घारे, विशाखा अडसूळ, प्रगती पिंगळे, हिमांगी टपळे, शर्वरी साठे, तन्वी गायकवाड, नंदिनी पाटोळे, साक्षी शेळके, मौली बिसेन आणि आर्या कुटे आदींनी बॅक टू स्कूल मध्ये भूमिका केल्या आहेत. प्रमुख कलाकार सह सव्वाशे पेक्षा जास्त कलाकार चित्रपटात आहेत. शुभांगी सतिश फुगे, सतिश महादु फुगे या चित्रपटाचे निर्माते असून प्राची सतिश फुगे कार्यकारी निर्माती आहे तर छायाचित्रण दिग्दर्शक श्रीनिवास नामदेव गायकवाड यांनी केले आहे.

या पोस्टर मध्ये एका पाटीवर दोन खडू ठेवलेले असून त्यावर शाळेचे चित्र रेखाटण्यात आले आहे. शाळेची सफर घडवणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर अतिशय आकर्षक असून ते शाळेच्या भावविश्वात नेणारे आहे. सतिश महादु फुगे आणि अमित नंदकुमार बेंद्रे यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या ‘बॅक टू स्कूल’ च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सतिश फुगे यांनी सांगितले की, ” शाळा म्हणजे आपले दुसरे घर. शाळेची गोष्टच निराळी आहे. आईनंतर तीच आपल्याला जगायला शिकवते. अनेक आठवणी शाळा जपते आणि त्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात. याच आठवणी नव्याने जागवण्यासाठी ‘बॅक टू स्कूल’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा असा आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी जवळचा असणारा हा सिनेमा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments