Wednesday, December 6, 2023
Homeमहाराष्ट्रऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक ठोकत विश्वचषकात केला मोठा पराक्रम… मोडला कपिल देव...

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक ठोकत विश्वचषकात केला मोठा पराक्रम… मोडला कपिल देव यांचा विक्रम

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने वानखेडे न भूतो न भविष्यति अशी कामगिरी करत अविश्वसनीय द्विशतक ठोकले. एकट्या मॅक्सवेलने संपूर्ण अफगाणी संघाच्या नाकेनऊ आणत संघाला अफलातून विजय मिळवून दिला. मॅक्सवेल हा विश्वचषकाच्या सारख्या टुर्नामेंटमध्ये द्विशतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या द्विशतकासह मॅक्सवेलने ‘द-ग्रेट’ कपिल देव यांच्या वनडेतील मोठा विक्रम मोडला. त्याने कपिल यांच्या १९८३ विश्वचषकातील १७५ या खेळीला मागे टाकत मोठी कामगिरी केली आहे.

ग्लेन मॅक्सवेलने कपिल देव यांचा विक्रम मोडला

ग्लेन मॅक्सवेल विश्वचषक स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यादरम्यान मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाने सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली.

कपिल देव यांनी १९८३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना अशीच खेळी करून संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला होता. त्यांची ही खेळी आयसीसीच्या इतिहासात अजरामर ठरली. त्याचीच पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने आज मुंबईत केली. या वर्ल्ड कपमध्ये तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकही त्याच्या बॅटने झळकले आहे. त्याने हे शतक ४० चेंडूत पूर्ण केले. मॅक्सवेल हा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments