शासनाद्वारे डे – एन यु एल एम आणि अमृत २.० च्या कृती उपक्रमातून पिंपरी चिंचवड मनपाची “वुमन फॉर वॉटर, वॉटर फॉर वुमन कॅम्पेन’’ यासाठी निवड करण्यात आलेली आहे. ‘जल दिवाळी’ या उपक्रमाचे आयोजन ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. शहरातील जलशुध्दीकरण केंद्राबद्दलची माहिती व महत्व पटवुन देणेकामी शहरातील तिन्ही विधानसभा निहाय प्रत्येक दिवशी १ गट (३० ते ४० महिला) या प्रमाणे एकूण १२० सहभागींसाठी नियोजन केले आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांच्या सूचनेनुसार सदरचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आज भोसरी विधानसभा मतदार संघातील ४० महिलांनी निगडी येथील सेक्टर २३ जलशुध्दीकरण केंद्रास भेट दिली. मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता संजय तुपसाखरे व डी. डी. पाटील तसेच ‘जल दिवाळी’ उपक्रमाचे समन्वयक व जलशुध्दीकरण केंद्राचे उपअभियंता सुरेखा कुलकर्णी, व वृषाली पोतदार, कनिष्ठ अभियंता यांनी महिलांचे स्वागत कापडी बॅग, स्टील पाणी बाटली व फुलांचे रोप देऊन केले.
पवना धरणातुन घरातील नळापर्यंत पाणी कसे येते, पाण्याचे शुध्दीकरण कसे केले जाते याची माहिती मनिषा हिंगणे यांनी दिली तसेच साईटवर प्रत्यक्ष प्रक्रिया दाखविण्यात आली. शुध्दीकरण केलेल्या पाण्याच्या तपासण्या कशा केल्या जातात याची माहीती केशव घाटगे यांनी दिली. महिलांनी सदर कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी पाण्याचे महत्व व उपलब्धता याबाबत माहिती सांगितली. पाणी कधीही शिळे होत नसते त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा व पाणी जपून वापरावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्या पाणी संबंधित शंकाचे निरसनही केले.
समाज विकास विभागाचे संजीव धुळम, रफी शेख, ज्योती भोसले, वैशाली सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले. सेक्टर २३ जलशुध्दीकरण केंद्र, निगडी येथील कार्यकारी अभियंता संजय तुपसाखरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.