Tuesday, April 22, 2025
Homeताजी बातमीऔरंगाबादच्या ‘सीओईपी’ची ‘भानगड’ एकांकिका पुरुषोत्तम करंडकाची मानकरी…

औरंगाबादच्या ‘सीओईपी’ची ‘भानगड’ एकांकिका पुरुषोत्तम करंडकाची मानकरी…

‘अरे, आव्वाज कुणाचा’, ’थ्री चिअर्स फॉर.. ’ घोषणांचा निनाद, ढोलाचा गजर, टाळ्या आणि शिट्ट्यांमध्ये औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची (सीओईपी) ‘भानगड’ एकांकिका पुरुषोत्तम महाअंतिम फेरीमध्ये करंडकाची मानकरी ठरली. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या ‘भू-भू’ एकांकिकेने सांघिक द्वितीय तर, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘कुपान’ एकांकिकेने सांघिक तृतीय क्रमांक मिळविला. साखराळे (जि. कोल्हापूर) राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘तुम्ही ऑर नाॅट टू मी’ एकांकिकेने सर्वोत्कृष्ट प्रायोगिक करंडक पटकाविला. जल्लोष, सळसळता उत्साह आणि घोषणेने सोमवारी भरत नाट्य मंदिराचा परिसर दुमदुमला. महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे पुरुषोत्तम करंडकाच्या अंतिम फेरीनंतर निकाल जाहीर करण्यात आला.

यावेळी आयकर विभागाचे आयुक्त (सवलत) अभिनय कुंभार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. राजेश पांडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, महाअंतिम फेरीचे परीक्षक सुबोध पंडे. संजय पेंडसे आणि नितीन धंदुके या वेळी व्यासपीठावर होते. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.

पांडे म्हणाले, सांस्कृतिक राजधानीचा पुरुषोत्तम करंडक हा सांस्कृतिक चेहरा आहे. विद्यापीठ हे केवळ पदवी देणारे केंद्र असू नये. तर, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे ते व्यासपीठ असले पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १८ जानेवारीपासून देशातील दीडशे विद्यापीठांतील युवक महोत्सवात विजेत्या संघांचा युवक महोत्सव होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments