Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीडोळ्यात पाणी आणणारी हि फडणवीस यांची हृदयस्पर्शी पोस्ट …

डोळ्यात पाणी आणणारी हि फडणवीस यांची हृदयस्पर्शी पोस्ट …

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडल्यानंतर फडणवीसांनी दिव्यांग मुलांच्या मनोबल या संस्थेला भेट दिली. यावेळी तेथील मुलीने त्यांचे पायाने औक्षण केले. याबद्दल फडणवीस यांनी हृदयस्पर्शी पोस्ट लिहली आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव मधील दिव्यांग मुलांच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. यावेळी एका दिव्यांग तरुणीने देवेंद्र फडणवीस यांना पायाने टीळा लावून औक्षण केल्याचं पाहायला मिळाले. तिने पायानेच ओवाळणीचे ताट धरत फडणवीस यांचे औक्षण केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी मनोबल या दिव्यांग प्रकल्पाची पाहणी करून तेथील मुलांशी संवाद साधला.

यावेळी भावुक झालेल्या फडणवीस यांनी ट्विट करत या प्रसंगाने आपल्या डोळ्यात पाणी आल्याचं सांगितलं. फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.”

ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले . “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!” या कवितेच्या ओळी लिहित त्यांनी हृदयस्पर्शी ट्विट केलं आहे. यावेळी फडणवीस यांच्या सोबत इतर मंत्री आणि आमदारांची उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments