Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीतुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली ‘आटपाडी नाईटस् ‘

तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली ‘आटपाडी नाईटस् ‘

२९ डिसेबंर

रविवार विशेष …!
नमस्कार मंडळी , आज रविवारचा निवांत का..?
काय बेत आहे ..? संडे धमाल मस्ती वर्षातील शेवटचा रविवार, काय मग येणार का …? आटपाडीला ……?
नाही .., तिकडे आटपाडीगावाला नाही तर ,
नितीन सुपेकर दिग्दर्शीत ‘आटपाडी नाईटसच्या’ कलाकारांसोबत गप्पा मारायला…!

अवघ्या महाराष्ट्राला प्रेमाच्या झांगड गुत्यावर थिरकावयला लावणारया वसंत खाटमोडे म्हणजे प्रणव रावराणे, आणी दिग्दर्शक नितीन सुपेकर यांच्याशी काल बोलताना ते सांगत होते, लैगिंक शिक्षण किती गरजेचे याविषयावर हा संपुर्ण चित्रपट बेतलेला असून,लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी पाठवताना सासू-सासरे, नवरा यांच्याशी कसे वागायचे? स्वत: कमीपणा घेऊन घरासाठी कसे झटत राहायचे? हा तथाकथित आदर्श वस्तुपाठच आजही अनेक घरांमधून दिला जातो. मुलगा कर्ता झाला की त्याचे लग्न झाले पाहिजे आणि लग्नाची पहिली रात्र सरत नाही तोपर्यंत घरात पाळणा हलला पाहिजे आणि याच पद्धती संसार नांदता झाला की मुलं पाहिजेचा धोशा सुरू होतो. या सगळ्या गणितांत आपण लग्न का करतो आहोत? याबद्दलच स्पष्ट जाणीव दूरच मुळात प्रेमात पडणं, प्रेमातला प्रणय याच्याही भ्रामक कल्पनाच मुख्यत्वे चित्रपटांच्या आधारे तरुण-तरुणींच्या मनात भरलेल्या असतात. या सगळ्याकडे लक्ष वेधत लैंगिक शिक्षण हे आजच्या काळात किती गरजेचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी ‘आटपाडी नाईट्स’च्या माध्यमातून केला आहे.

तुमच्या आमच्या सर्वांच्या बेडरूममधील गोष्ट पडद्यावर आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा दिग्दर्शक नितीन सुपेकारांनी केला आहे आणि तो तसा खराही आहे. मराठी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचा विषय मांडणे हे एकाअर्थी निर्माता-दिग्दर्शकांचे धाडसच आहे. आटपाडी गावच्या वसंत खाटमोडे (प्रणव रावराणे) नामक तरुणाची आणि त्यातही त्याला रात्री ज्या समस्येचा सामना करावा लागतो आहे, त्याची ही गोष्ट आहे. वसंता तब्येतीने किडकिडीत असल्याने त्याचे लग्न जमत नाही आहे. त्याच्या बारीक असण्यामुळे त्याला मित्रांकडून, गावकऱ्यांकडून सतत टिंगलटवाळीला सामोरे जावे लागते. हे सगळे वरवर हसण्यावारी नेणाऱ्या वसंताचे अखेर लग्न जमते. आणि त्याला प्रिया (सायली संजीव) सारखी,सुंदर मुलगी पत्नी म्हणून मिळते. मात्र, आपल्या बारीक असण्याबद्दलचा न्यूनगंड आधीच वसंताला आतून पोखरत असतो, त्यात लग्नानंतर तुला झेपेल का? ही गावकऱ्यांची चेष्टा त्याला अधिक जिव्हारी लागते. कुठलीही अडचण नसतानाही तणावात वावरणारा वसंता यातून नको त्या आग्रहाला बळी पडतो आणि लग्नानंतर लैंगिक संबंध चांगले राहावेत यासाठी नको त्या गोळ्या घेतो. लैंगिक संबंधांबद्दलच्या भ्रामक कल्पनांमधून वसंता बाहेर येतो का? या सगळ्याचा प्रियावर काय परिणाम होतो? ही गोष्ट फक्त वसंता-प्रियापुरती मर्यादित राहात नाही. तर खाटमोडे कुटुंबातही काय उलथापालथ होते, हे दाखवत बंद दारामागच्या या विषयाचे गांभीर्य समजावून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सुपेकर यांनी केला आहे.

वस्याचा खटाटोप, त्याला सल्ला देणारी मंडळी आणी
त्यातून उडालेली धमाल म्हणजे ‘आटपाडी नाईटस्’
संपुर्ण कुटूबांसोबत पहावा असा सिनेमा ….!

सरत्या वर्षाचा शेवट व नव्या वर्षांची सुरवात गोड करण्यासाठी “ आटपाडी नाईटस् “ एकदा बघाचं, अभिनेता-प्रणव रावराणे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments