Tuesday, December 10, 2024
Homeताजी बातमीगणेश मूर्ती विसर्जनासाठी आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंटचा उपक्रम स्तुत्य - खा....

गणेश मूर्ती विसर्जनासाठी आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंटचा उपक्रम स्तुत्य – खा. श्रीरंग बारणे

श्रींच्या मूर्तींचे हौदात विसर्जन करा, पर्यावरण रक्षणात सहभागी व्हा – विजय आसवानी

पिंपरीत आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेने गणेश भक्तांना मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. पवित्र पवना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गणेश भक्तांनी सहकार्य करावे आणि या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट यांच्या वतीने घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी कृत्रिम हौद उभारण्यात आले आहेत. याचे औपचारिक उद्घाटन खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी आमदार आण्णा बनसोडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर हिरानानी घुले, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे, प्रसाद शेट्टी, मनपा उपायुक्त संजय कुलकर्णी, पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, संयोजक विजय आसवानी, संयोजक विजय आसवानी आणि उद्योजक राजू आसवानी, श्रीचंद आसवानी, सतीश आसवानी, अनिल आसवानी यांनी आदी उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी विजयी आसवानी यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातून पवना आणि इंद्रायणी तर काही भा मुळा नदीचा प्रवाह जातो. या नद्यांना प्रदूषणापासून वाचविण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून गणेश भक्तांच्या सोयसाठी “श्रीं” च्या मूर्ती विसर्जनासाठी भव्य कृत्रिम हौदांची निर्मिती वैभव नगर पिंपरी येथे करण्यात आली आहे.या सुविधेचा परिसरातील नागरिकांनी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी घ्यावा आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करावे. येथे लहान, मोठ्या आकाराचे एकूण तीन हौद उभारण्यात आले आहेत. तसेच निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक आहेत. विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. खासगी जीवरक्षक नेमले आहेत. येथे विसर्जित केलेल्या मूर्तींचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मार्गदर्शनाखाली विघटन केले जाईल. त्यातून जमा झालेल्या साहित्याच्या आकर्षक कुंड्या बनवून त्या सहभागी नागरिकांना भाविकांना व गणेश मंडळांना संयोजकांच्या वतीने मोफत वाटप करण्यात येत आहे. या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक श्रीचंद आसवानी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments