Monday, April 22, 2024
Homeताजी बातमीसहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील हे गृहमंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरवले नाहीत…...

सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील हे गृहमंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरवले नाहीत… उपमुख्यमंत्री अजित पवार

५ फेब्रुवारी २०२१,
दिवंगत आर. आर. पाटील हे १२ वर्ष गृहमंत्री होते. त्यांचे सख्खे बंधू सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील हे गृहामंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरवले नाहीत. ते अत्यंत संयमी आणि शांत व्यक्ती आहेत, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या भावाच्या साध्या रहाणीमानाचं कौतुक पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये केलं. एखाद्याचा लांबून गृहमंत्री नातेवाईक असला तरी सर्व डिपार्टमेंट चालवत असतो असा संदर्भ यावेळी अजित पवारांनी देताच सभागृहात एकच हशा पिकला. राजाराम पाटील यांनी भाऊ गृहमंत्री असताना देखील वीस वर्षे साईड ब्रँचला काम केलं. राजराम पाटील हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दीड वर्ष झालं सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत असून त्यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा, अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ते, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रम, विविध सोशल मीडिया पेजेस शुभारंभ तसेच स्मार्ट पोलीस ठाणे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी अजित पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री म्हणाले की, सहाय्यक पोलीस आयुक्त राजराम रामराव पाटील त्यांच्या नवाचा शॉर्टफॉर्म देखील आर.आर. पाटील आहे. आर. आर. पाटील आणि आम्ही १९९० पासून एकत्र काम करत होतो. सभागृहात एकाच बेंच वर बसायचो. दुर्दैवाने आर. आर. पाटील लवकर सोडून गेले. ते त्याही वेळेस गृहमंत्री होते. सर्वाधिक १२ वर्ष ते गृहमंत्री राहिले. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याही वेळेस पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त राजराम पाटील हे अधिकारी होते. पण कधी ही ते गृहमंत्र्यांचा भाऊ आहे असे मिरवले नाहीत. ते अत्यंत शांत, संयमी आणि सरळ व्यक्ति आहेत. नाहीतर एखाद्याचा लांबून कोणीतरी नातेवाईक गृहमंत्री असला तरी सर्व डिपार्टमेंट चालवत असतो. राजराम पाटील यांची पोलीस सेवा ही ३३ वर्ष झाली असून स्वतःचा सख्खा भाऊ १२ वर्ष गृहमंत्री असतानाही त्यांनी वीस वर्षे साइड ब्रँचला काम केलं.” राजराम पाटील यांना ६५१ बक्षीस, दोन वेळेस राष्ट्रपती पदक मिळाले आहे.

आर.आर.पाटील यांचे बंधू राजाराम पाटील गहिवरले…

पोलीस आयुक्तालयातील प्रत्येकाने मला सहकार्य केले. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी दिलेलं प्रेम मी विसरू शकत नाही. केलेल्या कामाची नोंद इथली जनता घेते. इथल्या सहकारी, नागरिकांचे आभार मानण्यासाठी शब्द नाहीत असे सांगत सहाय्यक पोलीस आयुक्त राजराम पाटील गहिवरलेले पाहायला मिळाले.

सोशल मिडिया वापरत असताना ध चा मा होऊ देऊ नका

“सोशल मीडिया वापरत असताना ध चा मा होऊ देऊ नका काळजी घ्या. एकदा धनुष्यातून बाण सुटला तो परत काही घेता येत नाही. तसंच सोशल मीडियाच आहे. एका अधिकाऱ्याच्या तोंडून चुकून शब्द गेला. त्यांचं काम चांगलं होतं. पण, त्या शब्दांमुळे त्याला निलंबित करावं लागलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये तोल जाऊ देऊ नका. कधी कधी माणूस चिडतो. चांगलं काम करत असताना कोणीतरी डोकं तापविण्याचं काम करतो. तिथं डोक्यावर बर्फ ठेवून काम करा,” असा सल्ला अजित पवार यांनी पोलिसांना दिला आहे. “तापटपणा काढून टाका हे अजित पवार सांगतोय विचार करा थोडा यावर,” अशा शब्दांमध्येही त्यांनी अधिकाऱ्यांना समजावलं आणि सभागृहात हशा पिकला.

या कर्यक्रमाला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील, प्रेरणा कट्टे यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments