Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीमहानगरपालिका निवडणूकांसाठी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी ८ मार्चपासून अर्ज करावेत

महानगरपालिका निवडणूकांसाठी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी ८ मार्चपासून अर्ज करावेत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांसाठी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणा-यांनी मंगळवार दि. ८ मार्च महिला दिन पासून अर्ज करावेत असे आवाहन शहर कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे खराळवाडी पिंपरी येथिल कार्यालयात ८ मार्च पासून दुपारी ११ ते २ या वेळेत इच्छुक व्यक्तींनी आपले परिचय पत्र, कार्य अहवाल आणि फोटोसह दोन प्रतीमध्ये अर्ज करावेत असे आवाहन माजी महापौर कविचंद भाट यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांमध्ये १३९ जागा असणार आहेत. यामध्ये ५० टक्के जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. कॉंग्रेस पक्ष नेहमीच महिलांचा सन्मान व आदर करणारा पक्ष आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांनी महिला सक्षमीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन वेळोवेळी त्याची अंमलबजावणी केली आहे. काँग्रेसच्या सर्व समावेशक धोरणामुळेच आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगपालिकेत शेकडो महिलांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. पुढील कालावधीत देखील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ तसेच युवा महिला कार्यकर्त्यांना देखील उमेदवारीमध्ये संधी देण्याचे कॉंग्रेसचे धोरण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला भगिनींनी अर्ज करावेत असे आवाहन कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्याचा संकल्प शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केला आहे. माजी मंत्री व प्रा. स्व. रामकृष्ण मोरे यांच्या काळातील कॉंग्रेसचे गतवैभव पुन्हा मिळविण्यासाठी कॉंग्रेसच्या जुन्या जाणत्या नागरिकांनी व युवकांनी या निवडणूकीसाठी पक्ष संघटनेत योगदान द्यावे. या निवडणूकीत ज्येष्ठांबरोबरच युवकांना देखील कॉंग्रेस पक्षाकडून संधी मिळणार आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितुले यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहराची स्थापना कॉंग्रेस पक्षाने केली आहे. या शहरात भुमीपूत्रांबरोबरच देशभरातील सर्वच राज्यातून जिल्ह्यातून लाखो नागरिक उद्योग, व्यवसायासाठी आलेले नागरिक गुण्यागोविंदाने रहात आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागील कार्यकालात आतापर्यंत शेंकडो कामगार बंधू भगिनींना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन नगरसेवक व विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. आगामी काळात देखील कामगार क्षेत्रात कार्यरत असणा-या बंधू भगिनींना शहरातील विविध प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी संधी देण्याचे शहर कॉंग्रेसचे धोरण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामगार बंधू भगिनींनी अर्ज करावे असे आवाहन ज्येष्ठ नेते के. हरिनारायण यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments