Thursday, May 23, 2024
Homeगुन्हेगारीचित्रपटात अभिनेत्री म्हणून संधी देण्याचे सांगून .. अल्पवयीन मुलीवर लॉजवर अत्याचार

चित्रपटात अभिनेत्री म्हणून संधी देण्याचे सांगून .. अल्पवयीन मुलीवर लॉजवर अत्याचार

पुण्यात दिवसेंदिवसत गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, हडपरसमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे. घटनेतील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून संधी देण्याचे आमीष दाखवून एका नृत्यशिक्षकाने १५ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. हा शिक्षक हडपसर काळेपडळ येथील एका डान्स अकॅडमीमध्ये नृत्य शिकवत होता. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात बलात्कार व ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सुशील राजेंद्र कदम (वय ३२, रा. गोपाळपट्टी, यशोप्रभा सोसायटी शेजारी, मांजरी बुद्रुक) असे आरोपीचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय विद्यार्थी काळेपडळ येथील डान्स अकॅडमीमध्ये नृत्य शिकत होती. तेथे सुशील नृत्य शिकवत होता. चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमीष दाखवले आणि तिला वेगवेगळ्या लॉजवर नेले. तेथे आईवडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन त्याने या मुलीवर अत्याचार केले.

मुलीच्या आईला संशय आल्याने तिने पाठलाग करून एका लॉजवर या दोघांना पकडले असता, हा प्रकार समोर आला. या प्रकरणी १५ वर्षी पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याने आरोपी विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी तत्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण अबदगिरी करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments