२५ जानेवारी २०२०,
पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी कु. हर्षवर्धन महानंद यादव याने नुकत्याच दोहा कतार येथे झालेल्या, १४ व्या आशियाई स्पर्धेत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले, याला अनुसरून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा धोरणा अंतर्गत आमदार मा. लक्ष्मणराव जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तथा क्रीडा कला साहित्य व सांस्कृतीक समिती मा. तुषार हिंगे, स्थायी सभापती समिती मा. विलास मडिगेरी, आयुक्त मा. श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त मा. अजित पवार यांच्या हस्ते खेळाडू हर्षवर्धन यादव याला आर्थिक सहाय्यता १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आर्थिक साहाय्य केले जाते. नुकत्याच दोहा कतार येथे झालेल्या १४ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताकडून पिंपरी चिंचवड शहरातून खेळाडू कु. हर्षवर्धन यादव याने रौप्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेकरिता क्रीडा धोरणाच्यानुसार १ लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
आयुक्त दालनात झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक मा. निलेश बारणे, मा. अभिषेक बारणे, मा.राजू मिसाळ, मा. शत्रूघनु काटे, मा. हर्षल ढोरे, मा.मा.सुरेश भोर, मा. मोरेश्वर शेडगे, व मा. संदीप खोत सहायक आयुक्त, क्रीडा आदी उपस्थित होते.