चिंचवड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार आज दि.३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली,.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. आज दिनांक ३१ जानेवारी रोजी विहित वेळेत सुमारे २० व्यक्तींनी थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून नामनिर्देशन पत्र नेले आहेत. नामनिर्देशन पत्र नेताना नोंदवही मध्ये संबंधितांची प्राथमिक माहिती नोंदवली जात असून यामध्ये दिनांक व वेळेसह नामनिर्देशन पत्र नेणाऱ्या उमेदवाराचे नाव, पत्ता, नामनिर्देशन पत्रांची संख्या, राजकीय पक्षाचे संपूर्ण नाव, उमेदवाराचा प्रवर्ग, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आयडी, नामनिर्देशन पत्र ताब्यात घेणाऱ्याचे नाव, आदी बाबींची नोंद केली जाते. त्यानंतर नामनिर्देशन पत्र ताब्यात घेणाऱ्याची स्वाक्षरी घेऊन त्यास नामनिर्देशन पत्राची प्रत तसेच आचारसंहिता पुस्तिकेची प्रत दिली जात आहे.
नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे….
![](https://news14live.com/wp-content/uploads/2023/01/image-1024x645.png)