Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीआशा वर्कर्सच्या खात्यात जमा होणार २००० रुपये.

आशा वर्कर्सच्या खात्यात जमा होणार २००० रुपये.

12 November 2020.

सीटूप्रणीत आशा आरोग्य कर्मचारी युनियनतर्फे कोरोना काळातील कामाबद्दल दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, मनपा आयुक्तांनी दोन हजार रुपये मानधन देण्याचे मान्य केले होते.

परंतु,तेही वेळेवर मिळत नसल्याने आशा कर्मचारी नाराज होत्या.आता दिवाळी आली असल्यामुळे तरी हे मानधन मिळावे यासाठी मंगळवारी उपायुक्त बी.जी. नेमाडे व आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली.

सप्टेंबर-ऑक्टोबर दोन महिन्यांचे प्रत्येकी दोन हजार रुपये तातडीने आशा वर्करच्या खात्यावर जमा करण्याचे ठरले. यावेळी आशा वर्कर्सच्या नेत्या कॉ. मंगल ठोंबरे, पुष्पा शिरसाठ, संगीता जोशी, मानसी अभ्यंकर, फुरखाना फातेमा आदींची उपस्थिती होती.

दिवाळीच्या पार्श्ववभूमीवरही बातमी आशा वर्कर्ससाठी नक्कीच दिलासादायक ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments