पुणे जिल्ह्यातील पाषाण येथे धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने घराशेजारी खेळत असलेल्या लहान मुलीच्या डोक्यात वीट मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेत लहान गंभीर जखमी झाली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (27 नोव्हेंबर) रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
विकास राठोड असे आरोपीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये काही काळापासून वाद सुरू होते.पत्नीने जेवणात चिकन न केल्याने चिडलेल्या पतीने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली आणि तिला जखमी आहे. ही घटना पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी महिलेचेच्या नातेवाईकांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विकास नागनाथ राठोड (रा. वाकेश्वर रस्ता, पाषाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विकास राठोडला सोमवारी रात्री पत्नीने जेवण दिले. परंतु जेवणात चिकन नसल्याने चिडून त्याने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहे. अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.