पुणे महानगरपालिकेने (PMC) नदीकाठच्या परिसरात तातडीने स्वच्छता प्रयत्न सुरू केले आहेत. या ऑपरेशनमध्ये पुरामुळे जवळच्या रस्त्यांवर साचलेला मलबा आणि चिखल काढणे समाविष्ट आहे.
खडकवासला, मुळशी या धरणांतून सातत्याने विसर्ग सुरू असल्याने मुठा आणि मुळा-मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला आणि मुळशीतून होणारा विसर्ग थांबला असून, मुठा नदीचे पुराचे पाणी ओसरले आहे. परिणामी, पीएमसीने बाधित भागात व्यापक स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
याशिवाय, ASEZ WAO च्या माध्यमातून पुणे शहरातील फातिमा नगर येथे ‘Green Earth’ उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या स्वयंसेवकांनी दीड तासात एक टन कचरा गोळा केला. PMC ने या उपक्रमासाठी झाडू, हातमोजे आणि कचरा पिशव्या यांसारखे साहित्य पुरवले.