Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीविद्यार्थी शाळेत येत नसल्याने , पुण्यातील शिक्षकाने केली आत्महत्या

विद्यार्थी शाळेत येत नसल्याने , पुण्यातील शिक्षकाने केली आत्महत्या

पुण्यातल्या दौंड जिल्ह्यात एका शिक्षकाने तणनाशक पिऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.

शिक्षक हा समाज घडवण्याचं, पिढी घडवण्याचं काम करत असतो. अनेकदा अनेक शिक्षक तळमळीने शिकवतही असतात. मात्र अशा शिक्षकांबाबत कधीकधी मन सून्न करणाऱ्या बातम्याही समोर येतात. अशीच एक वाईट बातमी पुण्यातल्या दौंड तालुक्यात घडला आहे. विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने जिल्हा परिषद शिक्षकाने आत्महत्या केली.

दौंड तालुक्यात असलेल्या जावजी बुवाची वाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन महिन्यांपूर्वी अरविंद देवकर यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. मात्र विद्यार्थी शाळा सोडून गेले. ही बाब अरविंद देवकर यांच्या मनाला इतकी लागली की तणनाशक पिऊन अरविंद देवकर यांनी आयुष्य संपवलं. दोन महिन्यांपूर्वीच अरविंद देवकर यांची बदली झाली आहे.

गावातील छोट्याश्या शाळेची दुरवस्था पाहून अरविंद यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेतल. त्यानंतर त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदान आणि इतर गोष्टींचंही महत्त्व या माध्यमातून मुलांना पटवून देण्याचा अरविंद यांचा हेतू होता. मात्र अरविंद देवकर यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना पटला नाही. त्यांनी शाळेत येऊन गोंधळ घातला आणि मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवलं. शाळेतील सर्व १० विद्यार्थी ही शाळा सोडून गेल्याने अरविंद देवकर यांचं मानसिक खच्चिकरण झालं. चांगलं काहीतरी करण्याच्या हेतूने केलेल्या कृतीमुळे सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने त्यांनी तणनाशक औषधाचं सेवन करुन आत्महत्या केली. चिठ्ठीत हा सगळा घटनाक्रम अरविंद देवकर यांनी लिहून ठेवला आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments