कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अशातच चिंचवडमध्ये आज एका कारमध्ये तब्बल 43 लाखांची रोकड सापडली आहे. ही रोकड कुणाची आहे आणि कुणी आणली याचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाच्या अधिकारीकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित रक्कम कुठे नेली जात होती. याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून तपास सुरू आहे.एवढंच नाहीतर कारमध्ये धारदार हत्यार सापडली आहे. संबंधित कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.