Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीकोरोनामुळे अरुण गवळीची प्रकृती चिंताजनक; ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू

कोरोनामुळे अरुण गवळीची प्रकृती चिंताजनक; ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू

कुख्यात गुंड अरुण गवळीची कोेरोनामुळे प्रकृती आणखीणच खालावली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या गवळीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे अरुण गवळीला आता उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे

तुरुंग अधिकाऱ्यांनी गवळी व इतर कैद्यांची प्रकृती कारणास्तव कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी करवून घेतली. त्यामध्ये अरूण गवळीसह पाच कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने अरूण गवळीसह कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले.

हे ही वाचाः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सोमवारपासून सुरू

गेल्या चार दिवसांपासून अरूण गवळी याच्यावर तुरुंगातील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. गवळीला दिवसातून तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिली जात होती. परंतु, या उपचारांचा विशेष फायदा झाला नाही.

अखेर आज सकाळी त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने गवळीला मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. सध्या याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments