Tuesday, September 10, 2024
Homeताजी बातमीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई विमानतळावर आगमन व स्वागत…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई विमानतळावर आगमन व स्वागत…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी मुंबई दौऱ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले. भारतीय सैन्य दलाच्या तीनही दलांच्या वतीने यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांना मानवंदना देण्यात आली.

नागपूर येथील विविध कार्यक्रम आटोपून राष्ट्रपती मुर्मू यांचे दुपारी येथे आगमन झाले. मुंबई येथील दौऱ्यात राष्ट्रपती महोदया सिद्धीविनायक मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेणार आहेत, त्यानंतर राजभवन येथे त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments