Wednesday, February 21, 2024
Homeगुन्हेगारीचार वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या कोथरुड पोलिसांनी कडून अटक

चार वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या कोथरुड पोलिसांनी कडून अटक

चार वर्षांच्या बालिकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या एकास कोथरुड पोलिसांनी अटक केली. कोथरुड भागात ही घटना घडली. राजेश चोरगे (वय ३०, रा. सागर काॅलनी, बोराटे चाळ, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत बालिकेच्या आजोबांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चार वर्षांची बालिका घरासमोर खेळत होती. चोरगेने बालिकेला फिरायला नेतो, असे सांगून नेले. काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या परिसरात लावलेल्या बसजवळ बालिकेला नेले. अंधारात तिच्याशी अश्लील कृत्य केले. बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकून आजोबा तेथे गेले. परिसरातील रहिवाशी आणि आजोबांनी चोरगेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments