५ नोव्हेंबर २०२०,
रिपब्लिक टीव्ही’चा संपादक अर्णब गोस्वामी याला अलिबाग कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णब याच्या वकिलांकडून तात्काळ उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
वास्तुविषारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई येथून अटक केली होती. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या सुसाइड नोटमध्ये नाव असणाऱ्या फिरोज शेख, नितेश सारडा यांनाही पोलिसांनी सायंकाळी अटक करत कोर्टात हजर केले.
सरकारी पक्षाची पोलिस कस्टडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि अर्णब गोस्वामी सह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केल्याची अर्णब यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने कोर्टाने प्रथमदर्शनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचे सांगत न्यायलयाने त्यांची तक्रार फेटाळून लावली होती.