Friday, October 4, 2024
Homeगुन्हेगारीपुण्यातील ओशो आश्रमातील प्रशासन आणि ओशो अनुयायांमधील वाद विकोपाला… अनुयायांचा राडा आणी...

पुण्यातील ओशो आश्रमातील प्रशासन आणि ओशो अनुयायांमधील वाद विकोपाला… अनुयायांचा राडा आणी घोषणाबाजी

पुण्यातील ओशो आश्रमातील प्रशासन आणि ओशो अनुयायांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले. यात अनेक अनुयायी जखमी झाल्याचे वृत्त आहे. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली.

आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर १५० ते २०० ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला.

आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत.

यावेळी ओशो आश्रमाच्या बचावासाठी अनुयायांनी व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार केला. घडलेल्या या प्रकारानंतर तणाव वाढला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेनंतर ओशो अनुयायांनी आश्रमाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments