Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रस्थायी समिती बैठकीमध्ये शहराच्या विविध विकास कामास मंजुरी

स्थायी समिती बैठकीमध्ये शहराच्या विविध विकास कामास मंजुरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

सन २०२३- २४ करिता काळेवाडी, पवनानगर, विजयनगर, किवळे मामुर्डी, रावेत येथील सेक्टर नं. २९, सिटी प्राईड शाळेलगतचा परिसर, म्हस्के वस्ती, शिंदे वस्ती, काळेवाडी, नढेनगर, कोकणेनगर व इतर परिसरात मुख्य जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. मनपाचे प्रभाग क्र. २ मधील अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामांवर कार्यवाहीसाठी लागणारी यंत्रसामृगी व मनुष्यबळ पुरविणेकामी तसेच मनपाचे नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी येथील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची वार्षिक पद्धतीने देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

चिखली सेक्टर क्रमांक १७ व १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ई.डब्ल्यु.एस) गृहप्रकल्पामध्ये बहुउद्देशीय इमारत बांधणेकामी येणाऱ्या खर्चास प्रभाग क्र. २५ पुनावळे येथील गायकवाड नगर मधील १८.०० मीटर रुंद डी.पी रस्त्यांची उर्वरित स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. ८ मध्ये जलतरण तलाव विकसित करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. २४ किवळे येथील उद्यानाकरिता आरक्षित असलेल्या मनपाच्या ताब्यातील जागेत भारतरत्न राष्ट्रीय उद्यान विकसित करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक २ मधील बोऱ्हाडेवाडी व बनकरवस्ती परिसरात पावसाचे पाण्यासाठी आरसीसी पाईप लाईन टाकणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये फुटपाथ, स्ट्रॉर्म वॉटर व इतर स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये गल्ल्यांचे कॉन्क्रीटीकरण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच जल्लोष शिक्षणाचा २०२३ मधील विजेत्या शाळांना क्रीडा साहित्याची खरेदी करून पुरवठा करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या क्ष किरण विभागातील डिजीटल रेडिओग्राफी सिस्टमसाठी जनरेटर खरेदी करणेकामी तसेच मनपाचे प्रभाग क्रमांक ३ मोशी डुडुळगाव व इतर परिसरातील स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १९ मधील मनपा इमारतीमध्ये फर्निचर व इतर देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी तसेच मनपाचे प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी, दत्तवाडी व परिसरातील स्ट्रॉम वॉटर, फुटपाथ विषयक कामे करणेकामी मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची व इतर अनुषंगिक कामे करणेकामी तसेच बिजलीनगर, दळवीनगर, चिंचवड, तानाजीनगर, केशवनगर व इतर परिसरात जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे अ क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभाल करणेकामी तसेच मनपाच्या भाटनगर येथील लिंक रस्त्यावरील विद्युत दाहिनीचे तीन वर्षाकरिता चालन देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १९ मध्ये रोड फर्निचर व इतर अनुषंगिक कामे करणेकामी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीनुसार स्थापत्य विषयक सुधारणांची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १७ मधील वाल्हेकरवाडी, भोंडवेवस्ती इ. भागातील रस्त्यांची दुरूस्तीची कामे हॉटमिक्स पद्धतीने करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच मनपाच्या मालकीची चिंचवड येथील २००० चौ.मी मोकळी जागा तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबीर / ट्रांझीट कॅम्पकरिता भाडेतत्वावर उपलब्ध करून देणेबाबत मान्यता देण्यात आली.

मौजे, चिखली प्राधिकरण येथील प्रभाग क्र. ११ मधील उपहारगृह (४ गाळ्यांचे) ताबे देणेबाबत तसेच प्रभाग क्रमांक १७ मधील शिवनगरी, बिजलीनगर इत्यादी भागात आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी तसेच विविध भागात आवश्यकतेनुसार पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, चेंबर्स, पेव्हिंग ब्लॉक इ. दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे वायसीएमएच रुग्णालयासाठी आवश्यक लिनन साहित्य खरेदी करणेकामी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) व स्थापत्य आभियांत्रिकी सहाय्यक कर्मचारी यांचेसाठी सेवाप्रवेश पातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments