पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकपदीआयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी यासंदर्भातील आदेश आज (दि.०३) दिलेआहेत.
राज्य निवडणूक आयोगाने माहे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहित वेळेत घेणेशक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३U तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ६,६(अ) मधील तरतुदीनुसारपालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रमहानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व विशेषतः कलम ४५२अ च्या (१अ) व (१ब) मधील तरतुदीनुसार दि.१३.०३.२०२२ रोजी मुदत संपतअसलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे प्रशासक पदी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्तीकरण्यात येत असल्याचे राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आदेशात म्हटले आहे.


