Monday, May 12, 2025
Homeउद्योगजगतपीसीएमसी हिरकणी सन्मानासाठी अर्ज करण्याचे महिला उद्योजकांना आवाहन

पीसीएमसी हिरकणी सन्मानासाठी अर्ज करण्याचे महिला उद्योजकांना आवाहन

११ मार्च २०२१,
आज एकविसाव्या शतकामध्ये अनेक महिला आपले करियर, उद्योग-व्यवसाय सांभाळून कुटुंबाची देखील जबाबदारी पार पाडतात. एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होतात. अशा कर्तबगार महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या मराठी मातीमधील आदर्श माता आणि कर्तबगार स्त्री असलेल्या हिरकणी यांच्या नावाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांच्या वतीने पीसीएमसी हिरकणी सन्मान देण्यात येणार आहेत.या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.

पीसीएमसी हिरकणी सन्मानाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. केवळ महिलांनी सुरु केलेल्या, महिलांद्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट स्टार्ट अपला सामाजिक संस्थांकडून १ लाख रुपयांची सहाय्यता देण्यात येणार आहे. तसेच महिला सुरक्षेसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना, उपकरण किंवा तत्सम व्यवस्थेकरता ५० हजार रुपयांची सहाय्यता देण्यात येणार आहे. सुरक्षिततेविषयी असलेल्या स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुषदेखील सहभागी होऊ शकतात.

सदर पीसीएमसी हिरकणी सन्मानासाठी नामांकन भरण्याची सुरुवात दिनांक ८ मार्च २०२१ पासून होणार असून. अंतिम दिनांक १० एप्रिल आहे. या स्पर्धेसाठी डॉ. अपूर्वा पालकर, (संचालक – इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि लिंकेजेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ परीक्षक मंडळ विजेत्यांची निवड करणार आहे.

पीसीएमसी हिरकणी सन्मानाकरिता स्पर्धेमध्ये पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपच्या माध्यमातून अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्ज अॅपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पीसीएससीएल हिरकणी सन्मान प्राप्त करण्यासाठी अर्ज भरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

PCMC Smart Sarathi

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments